ABP Majha Headlines : 8:00AM : 6 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8:00AM : 6 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार
महायुतीची आज संध्याकाळी बैठक, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि नेते उपस्थित राहणार, विधान परिषद निवडणूक आणि शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचं मार्गदर्शन केलं जाणार.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा
विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी..
दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग...
मुख्यमंत्री शिंदे माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार..एक दिवस वारकऱ्यांसह करणार पायी वारी