ABP Majha Headlines : 4 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पूर्व तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत बदली झाली आहे. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत.