ABP Majha Headlines : 8 PM : 3 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 PM : 3 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पिलावळांनी हा संप पुकारलाय अशी, टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. मविआ सरकारच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळणार होता. मात्र टक्केवारीवर नजर ठेवत एसटी कर्मचारी संघटनेनं हा वेतन आयोग लागू होऊ दिला नाही असा गंभीर आरोपही गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पिलावळांनी बंद (ST bus strike) करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व लोकं रिटायर्ड हार्ट लोकं आहेत. 'तुम लढो हम कपडे संभालेंगे', अशी ही लोक आहेत. महाविकास आघाडीच्या लोकांनी थोतांड सुरु आहे. कोणत्याच परिस्थितीत कोणालाही टक्केवारी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असं गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात सातवा वेतनाच्या आयोगाची घोषणा होणार होती. तशी चर्चा आमच्यासोबत झाली होती. मात्र, ह्या संघटनांनी करार करा असं सांगितलं, आणि यांनीच हे सर्व थांबवलं. आम्ही 65 हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतो, आमदार पडळकर, पावसकर यांच्या संघटना या संपात उतरल्या नाहीत, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.