ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 28 July 2024 : Maharashtra News
राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर. सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.तर ज्येष्ठ भाजप नेते हरीभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल.
कोकणासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता.... गुजरात ते केरळदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी वाढल्याने अनेक भागात पाणी, जिल्ह्यातील 98 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद झाल्याने दिलासा
कृष्णा नदीची पाणी पातळी 40.5 फुटांवर,पावासाचा जोर वाढल्यास बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता, जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज
नवी मुंबईच्या वाशीत हिट अँड रनची घटना, इनोवा कारच्या चालकाची रिक्षेला धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू, वाहनचालक फरार
बीड, जालन्यातील स्थिती चिंताजनक, दोन्ही जिल्ह्यांचा शरद पवार करणार दौरा, राज्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन बाजू घेतल्या हे चूक, माझा महाकट्ट्यावर पवारांनी मांडली भूमिका
अहमदनगरमध्ये मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेआधी आरक्षण प्रश्न मार्गी लावणार, पवारांचं मराठा आंदोलकांना आश्वासन
शिंदेंची शिवसेना विधानसभेसाठी अॅक्शन मोडवर... ११३ मतदारसंघाची चाचपणी, ४६ प्रभारी जाहीर