ABP Majha Headlines : 3 PM : 23 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 3 PM : 23 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाविकास आघाडीमधील (MahaVikas Aghadi) मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच सुरूच असल्याचं दिसतंय. एकीकडे चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा उद्धव ठाकरेंचा आग्रह तर आधी निवडणुकांना सामोरं जाऊ मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका असल्याने अद्याप तिढा सुटलेला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांच्या पक्षांची भूमिका जाहीर केली आहे. आम्हाला मुख्यमंत्रीपदात रस नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आमच्याकडे मुख्यमंत्रीपदामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. आम्हाला परिवर्तन हवं आहे,जनतेला पर्याय हवं आहे त्यासाठी आम्ही काम करत आहोत. लोकांना पर्याय हवाय तो पर्याय उपलब्ध व्हावा . 3 सप्टेंबरला कागलमध्ये जातोय तिकडे सभा घेणार आहे. अनेक जण येत आहेत. कामानिमित्त अनेकजण भेटत आहेत. तीन पक्ष एकत्रित आहेत अजून डावे पक्ष यावेत अशी इच्छा आहे.
समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे : शरद पवार
बदलापूर घटना अतिशय चिंताजनक आहे. शालेय प्रांगणात असा प्रकार होणे ही बाब चांगली नाहीय. सतर्क राहून भूमीका घेतली पाहिजे. बालिका आणि मुलींवर अत्याचार होतोय हे चित्र राज्यात वाढत आहे. याविरोधात राग व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा बंद असेल हा बंद शांततेत असेल. समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे. महाराष्ट्रातील जनता जनमत तयार करायला या संपात सहभागी होतील, असे शरद पवार म्हणाले.