ABP Majha Headlines : 5:00PM : 20 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 5:00PM : 20 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पवार काका पुतण्यांमध्ये दुरावा...शरद पवारांपासून दोन खुर्च्या सोडून अजित पवार बसले, बैठकीत पवार, सुप्रिया सुळेंकडे बघणंही अजितदादांनी टाळलं..
पुणे जिल्हा समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि सुनिल शेळकेंमध्ये खडाजंगी, मावळप्रमाणे बारामती, शिरुरलाही निधी मिळावा, सुळेंची मागणी, तर शेळकेंचाही पलटवार
अदानींना झेपत नसेल तर धारावीचं टेंडर रद्द करुन नव्याने काढा, उद्धव ठाकरेंची मागणी, मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी- शाहांचा डाव असल्याचा आरोप
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम, ४१ दिवसांत आचारसंहिता लागेल जोमाने कामाला लागा, ठाकरेंच्या संपर्कप्रमुखांना सूचना
अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, पवार म्हणतात, अतुल बेनके माझ्या मित्राचा मुलगा, तर अजित पवार म्हणतात सीट धोक्यात आल्याने भेट
नागपुरात दमदार पाऊस, मनपाच्या कामांमुळं रस्त्यांवर पाणीच पाणी, शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर..सहा तासांत नागपुरात २१७.४ मिमी पावसाची नोंद
चंद्रपूरच्या नागभीडमधील विलम नाल्यात १३ वर्षांचा मुलगा गेला वाहून ... तर उमा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने चिमूर शहरातील घरांमध्ये शिरलं पाणी..
मनोज जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण सुरु..सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह ९ मागण्यांसाठी आंदोलन, अंतरवालीला कुणीही येऊ नये असं आवाहन..