ABP Majha Headlines : 08 PM : 18 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP HEADLINES 08 PM: इंदापूर विधानसभेला मदत केली तरच बारामती लोकसभेत मदत करु, तीन वेळा पाठीत खंजीर खुपसला, अंकिता पाटलांचा अजित पवारांवर नाव न घेता आरोप, तर अजित पवारांचाही पलटवार
महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार, सुप्रिया सुळेंविरोधात भावजय सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, महाराष्ट्रातील एका
बड्या नेत्याचा दावा
संसदेत मुद्दे मांडण्यासाठीच आम्हाला जनतेनं निवडून दिलं, भाषण करण्यासाठीच संसद असते, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर.
काँग्रेस आमच्या रक्तात! ही विलासरावांची शिकवण त्यामुळे मी जेथे आहे तेथे ठीक आहे, लातुरात अमित देशमुखांचं वक्तव्य तर समाजाची नाळ तोडून इकडे तिकडे जाणे अपेक्षित नाही, पक्षांतराच्या चर्चांवर स्पष्टीकरण
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींचा, अबकी बार चारसो पारचा निर्धार, काँग्रेसवरही सडकून टीका
अमित शाहांची अधिवेशनातून सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका, इंडिया आघाडीतील प्रत्येक नेत्याच लक्ष्य आपल्या कुटुंबातील सदस्यांवर, शाहांचा हल्लाबोल.
जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, तर २० तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार
आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, तर दांडपट्ट्याला राज्यशस्त्र घोषित करणार
कांदा निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने हटलवली.. तर कांदा निर्यातीवर३ लाख मेट्रिक टनाची मर्यादा.
राजकोट कसोटीत भारताचा ४३४ धावांनी दणदणीत विजय, जडेजाच्या पाच विकेट्स, कुलदीपची फिरकीही प्रभावी, जैस्वालच्या द्विशतकाचंही मोलाचं योगदान