ABP Majha Headlines : 0630AM : 17 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
रत्नागिरी, सिंधुदुर्गला आज ऑरेंज तर रायगड, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट, काल दिवसभर मुंबईसह मुंबई उपनगर, कोकण आणि कोल्हापूर साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत... डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गॅबियन वॉल ढासळण्याची भीती
कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली, तर साताऱ्यात कराड चिपळूण महामार्गावर पाणी, वाहतूक विस्कळीत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्यावर पार पडली सर्व मंत्र्यांची बैठक, शिवसेनेचा वर्धापन दिल आणि इतर घडामोडींचा शिंदेंनी आढावा घेतल्याची माहिती
ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपात प्रवेश करणार, बडगुजर माजी नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करणार
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, कोल्हापूर शहराची हद्दवाढीसह कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सर्व पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता
भरत गोगावलेंकडून बगलामुखी पुजारी आणून अघोरी पूजा... ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोेरेंचा भरत गोगावलेंवर आरोप... गोगावलेंकडून आरोपांचं खंडन
सरकारचा यंदाही वारकऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय, मानाच्या पालखी मार्गावर मिळणार टोलमाफी..१८ जून ते १० जुलैदरम्यान निर्णय लागू
इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा नवा व्हिडीओ समोर...विमानातून टिपला १००हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा






















