ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM : 22 July 2024 : Maharashtra News
मुंबईत सकाळपासूनच पाऊस सुरूच, पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर वाहनांचा वेग मंदावला, लोकल वाहतुकीवरही परिणाम
मुंबईतल्या सात धरणांमध्ये सरासरी ४७ टक्के पाणीसाठा, तानसा धरण ८४ टक्के तर मोडकसागर ६५ टक्के भरलं
कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली, पावसाचा जोर ओसरला तरीही पाणीपातळीत संथ गतीनं वाझ
जुलै महिन्याची 22 तारीख उजाडली तरी उजनी धरणात उणे २२ टक्के पाणीसाठा, जायकवाडी धरणातही फक्त ४ टक्के पाणीसाठा शिल्लक
पुण्यातील पिंपरीमध्ये हिट अँड रनची घटना, रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेला कारची धडक, महिला जखमी, चालक पसार.
मविआच्या नेत्यांना ठोकून काढा या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार, राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा, राऊतांचं आव्हान
अमित शाहांचे शरद पवारांवरील आरोप निराशा आणि वैफल्यातून, संजय राऊतांची बोचरी टीका