(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 12 July 2024 Marathi News
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक.....महायुतीचे ९ तर मविआकडून ३ उमेदवार रिंगणात... १२ उमेदवारांपैकी कोणाचा पराभव होणार याची उत्सुकता
काँग्रेसचे एकूण 8 आमदार राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप उमेदवारांना मतदान करणार असल्याची चर्चा, विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराला वेग आल्याचा दावा
विधान परिषदेची निवडणुकीआधी सर्व पक्षांकडून मतांची जुळवाजुळव, भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेसच्या बैठका, काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदारांची दांडी
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची ३-४ मतं फुटणार, शेकापच्या जयंत पाटलांचा दावा, काँग्रेसच्या तीन ते चार डाऊटफुल आमदारांची व्यवस्था पक्ष करेल, कैलास गोरंट्याल यांचा इशारा
पहिल्या पसंतीच्या मतांवर दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची अजितदादांचं प्लॅनिंग, आमदारांच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा विश्वास...