(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 11 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कोलकात्यानं हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून तिसऱ्यांदा जिंकली आयपीएल; कोलकात्याच्या यशात कर्णधार श्रेयस अय्यरसह चार मुंबईकरांचा मोलाचा वाटा
नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांची रसद, सामनाच्या रोखठोक सदरामधून संजय राऊतांचा गंभीर आरोप...तर राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन, मुनगंटीवारांचा पलटवार...
गडकरींचं नेतृत्व संपवण्याचा भाजपचा आधीपासूनच प्रयत्न, अंबादास दानवेंचा दावा...तर राऊतांनी गडकरींच्या घरी जाऊन प्रेम व्यक्त करावं, काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा टोला...
अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या यंत्रणेकडून प्रयत्न, सामनातून संजय राऊतांचा दावा, तर ४ जूनला दूध का दूध, पानी का पानी होईल, शिंदेंचा पलटवार
भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, किसन कथोरेंनी विरोधी उमेदवाराला मदत केली, कपिल पाटलांचा आरोप, कथोरेंनी आरोप फेटाळले
नियमबाह्य कामे न केल्यानं मंत्र्याकडून निलंबन, पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर नाव न घेता निशाणा
उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार...दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार..
बीड, पंढरपूर, यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी.. वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं, घरांचं मोठं नुकसान
बंगालच्या उपसागरात काही तासांत 'रेमल' चक्रीवादळ ध़डकणार, कोलकाता विमानतळ बंद, पश्चिम बंगालसह ओडीशामध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
डोंबिवली स्फोटाच्या ४ दिवसांनंतर एनडीआरएफनं शोधकार्य थांबवलं, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचं काम सुरु, डोंबिवली स्फोटाचा नवा व्हिडीओही समोर