(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 11 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयाने झापल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग.. शाळेचे ट्रस्टी आणि सहआरोपी असलेल्या तुषार आपटे, उदय कोतवालला अखेर पोलिसांकडून अटक
जागावाटपात अधिकच्या १० जागा मिळण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा अमित शाहांच्या मागे लकडा...प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शाहांची दोनदा भेट घेतल्याची माहिती...
कुडाळमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता.. वर्षावर नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक... उदय सामंतांनीही निलेश राणेंच्या पाठीशी असल्याचं केलं स्पष्ट...
महाविकास आघाडीतला मुंबईतील ३६ पैकी २३ जागांचा तिढा सुटला. ठाकरेंना १२, काँग्रेसला ८ जागा, तर राष्ट्रवादी आणि समाजवादीला प्रत्येकी एक जागा ठरल्याची माहिती
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त इंडिया आघाडीचा लाँग मार्च.. वर्षा गायकवाड, भाई जगतापांसह दिग्गज नेते सहभागी...
बंदुकीचा ट्रिगर गोविंदाने स्वत: दाबल्याचा पोलिसांना संशय...मिसफायर प्रकरणी अभिनेता गोविंदाचा पुन्हा जबाब नोंदवणार...
उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह.. राज्यभरात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी पूर्ण, मंदिरं आकर्षक रोषणाईने सजली