Pakistan Missile : काश्मीर ते कन्याकुमारी भारत सोडाच, पण अमेरिका सुद्धा पाकिस्तानी मिसाईलच्या एकाच टप्प्यात! आम्हाला धोका म्हणत अमेरिकेनं घेतला तगडा निर्णय
Pakistan Missile : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची शाहीन-सिरीजची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे एनडीसीच्या मदतीने विकसित करण्यात आली आहेत.
Pakistan Missile : अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (डेप्युटी NSA) जॉन फिनर यांनी पाकिस्तानचा प्रगत क्षेपणास्त्र कार्यक्रम, म्हणजेच लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम अमेरिकेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. फिनर म्हणाले की, पाकिस्तानने यासंबंधीचे तंत्रज्ञान घेतले आहे. या तंत्रज्ञानाने बनवलेली क्षेपणास्त्रे केवळ आशियाई देशांवरच नव्हे तर अमेरिकेवरही हल्ला करू शकतात. फिनर म्हणाले, यामुळे पाकिस्तानच्या हेतूवर प्रश्न निर्माण होतात. मात्र, पाकिस्तानने अशी क्षेपणास्त्रे बनवली आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वॉशिंग्टन स्थित थिंक टँक, कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस येथे भाषण देण्यासाठी जॉन फिनर आले होते.
पाकिस्तान हे अमेरिकेसाठी नवे आव्हान
फिनर म्हणाले की, पाकिस्तान अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचे दिसत आहे. फिनर यांच्या मते, केवळ तीन देश आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत आणि अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची क्षमता आहे. यामध्ये रशिया, चीन आणि उत्तर कोरियाचा समावेश आहे. तिन्ही देश अमेरिकेच्या विरोधात आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानची ही पावले अमेरिकेसाठी नवीन आव्हान बनत आहेत. फिनर म्हणाले, पाकिस्तानचे हे पाऊल धक्कादायक आहे, कारण तो अमेरिकेचा मित्र आहे. आम्ही आमची चिंता पाकिस्तानकडे अनेकदा मांडली आहे. आम्ही कठीण काळात त्यांना साथ दिली आहे आणि पुढेही आमचे नाते टिकवून ठेवण्याची इच्छा आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचे हे पाऊल आपल्याला असा प्रश्न विचारायला भाग पाडते की, आपल्याविरुद्ध वापरता येईल अशी क्षमता त्यांना का मिळवायची आहे?
Imposing sanctions from above, fuelling political turmoil from within, pouring terror from across the borders, and (eventually) using the IMF. It is all about Pakistan’s nuclear capability. https://t.co/4bYFVebMOJ
— Syed Talat Hussain (@TalatHussain12) December 18, 2024
पाकिस्तानच्या 4 संरक्षण कंपन्यांवर बंदी
बुधवारी अमेरिकेने पाकिस्तानच्या चार संरक्षण कंपन्यांवर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्यावर बंदी घातली होती. यामध्ये पाकिस्तानची सरकारी एरोस्पेस आणि संरक्षण संस्था, नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स (NDC) देखील समाविष्ट आहे. याशिवाय एफिलिएट्स इंटरनॅशनल, अख्तर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, रॉकसाइड एंटरप्राइजवरही बंदी घालण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआयने अमेरिकेच्या हवाल्याने म्हटले आहे की, चार बंदी घातलेल्या कंपन्या पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी आवश्यक साधने पुरवत आहेत. अमेरिका भविष्यातही अशा कारवायांविरुद्ध कारवाई करत राहील.
एनडीसीच्या मदतीने बनवलेले शाहीन मालिकेचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची शाहीन-सिरीजची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे एनडीसीच्या मदतीने विकसित करण्यात आली आहेत. याशिवाय कराचीच्या अख्तर अँड सन्स प्रायव्हेट कंपनीवर एनडीसीला क्षेपणास्त्रांशी संबंधित मशीन खरेदीमध्ये मदत केल्याचा आरोप आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेने तीन चिनी कंपन्यांवर पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी तंत्रज्ञान पुरवण्यावर बंदी घातली होती. या यादीत बेलारूसच्या एका कंपनीचाही समावेश होता. नोव्हेंबर 2019 मध्ये पाकिस्तानने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या शाहीन-1 क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्याची रेंज 650 किमी पर्यंत आहे. ते सर्व प्रकारची शस्त्रे वाहून नेऊ शकते. याशिवाय पाकिस्तानने शाहीन-2 आणि शाहीन-3 क्षेपणास्त्रांची चाचणीही केली आहे.
पाकिस्तानचा क्षेपणास्त्र कार्यक्रम 80 च्या दशकात सुरू झाला
पाकिस्तानने 1986-87 मध्ये हत्फचा क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरू केला होता. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली याची सुरुवात झाली होती. या कार्यक्रमात पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाला लष्कराचा थेट पाठिंबा होता. याअंतर्गत पाकिस्तानने प्रथम हत्फ-1 आणि नंतर हत्फ-2 क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हत्फ-1 80 किमीच्या रेंजवर मारा करण्यास सक्षम होते आणि हतफ-2 300 किमीच्या रेंजवर मारा करण्यास सक्षम होते. ही दोन्ही क्षेपणास्त्रे 90 च्या दशकात लष्कराचा भाग बनली होती. यानंतर, हत्फ-1 विकसित करण्यात आला आणि त्याची स्ट्राइक रेंज 100 किलोमीटरने वाढवण्यात आली. 1996 मध्ये पाकिस्तानने चीनच्या मदतीने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान घेतले. त्यानंतर 1997 मध्ये हत्फ-3 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली, ज्याची रेंज 800 किलोमीटरपर्यंत होती. 2002 ते 2006 या काळात भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानने सर्वाधिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली.
इतर महत्वाच्या बातम्या