वर्ध्यातील धक्कादायक घटना, गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, जबड्याला गंभीर दुखापत
Wardha News : वर्ध्याच्या (Wardha) आष्टी तालुक्यातील साहूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गावठी बॉम्ब (bomb) गायीने (Cow) खाताच स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Wardha News : वर्ध्याच्या (Wardha) आष्टी तालुक्यातील साहूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गावठी बॉम्ब (bomb) गायीने (Cow) खाताच स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जंगली डुकरांची शिकार करण्यासाठी ठेवण्यात आलेला गावठी बॉम्ब गायीने खाल्ला व त्याचा लगेच स्फोट झाला आहे. या अपघातात गायीच्या जबड्याच्या चिंधड्या उडाल्या असून, जीभ गळून पडली आहे. ही घटना गावालगत असलेल्या शेतशिवारात घडली.
रानडुकरांच्या शिकारीसाठी कणकीच्या गोळ्यात ठेवला होता गावठी बॉम्ब
शेतकरी साहेबराव उंबरकर यांची गाय नेहमीप्रमाणे कळपातील गायींसोबत जंगलात चरायला गेली होती. दरम्यान, रानडुकरांच्या शिकारीसाठी जंगलात कणकीच्या गोळ्यात गावठी बॉम्ब ठेवला होता. हा बॉम्ब खाण्याचा प्रयत्न गायीने केला. गायीने बॉम्ब चावण्याचा प्रयत्न करताच त्याचा स्फोट झाला आहे. यामध्ये गाय गंभीररित्या जखमी झाली आहे. हे गावठी बॉम्ब परिसरातील पारधी बेड्यावर सहज उपलब्ध होत असल्याचे परिसरात बोलले जात आहे.
जंगलात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा वावर
जंगलात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा वावर आहे. हे रानडुक्कर शेतकऱ्यांसाठी मोठे त्रासदायक आहेतत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसात न करतात. त्याचबरोबर माणसांवर देखील हल्ले करतात. त्यामुळं या रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी जंगलात कणकीच्या गोळ्यात गावठी बॉम्ब ठेवला होता. जेणेकरुन रामडुकरांना यापासून इजा व्हावी असा उद्देश होता. मात्र, हा बॉम्ब गायीनं तोंडात घेतल्यानं फुटल्याची घटना घडली.
महत्वाच्या बातम्या:
Viral : पंतप्रधानांच्या निवासस्थानी नव्या पाहुण्याचे आगमन, सौभाग्याचं प्रतिक समजतात 'या' दुर्मिळ गायीला, किंमत वाचून थक्क व्हाल