ABP Majha Headlines : 10 PM : 29 June : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर भारताचं १७७ धावांचं आव्हान, दोन फलंदाज तंबूत परतल्यावर स्टब्ज-़डी कॉक जोडीची आक्रमक बॅटिंग
आगामी निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जायचं, भाजप प्रभारींचे कोअर कमिटी सदस्यांना निर्देश..तर बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला
फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो...
देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका...
२०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरुन राज ठाकरेंचं टीकास्त्र, अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत
विधीमंडळात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन घमासान..निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनेची घोषणा, विरोधकांचा आरोप तर लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक हक्कभंग आणण्याच्या तयारीत
महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा...मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण...
भविष्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षा राज्यांमार्फत घेण्याचा विचार होऊ शकतो, अजित पवारांचे संकेत...कडक कायदा करण्याची विरोधकांची मागणी...
राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय. तर आता सरकारवरच तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ, विरोधकांचा हल्लाबोल...
विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास, काँग्रेसमुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला
नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली...लातूरसोबत बीडचंही कनेक्शन... आरोपींकडे सापडलेल्या १४ एडमिट कार्ड पैकी ७ कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा.. अतिक्रमण विभागाकडून वसंत गितेंचे संपर्क कार्यालयावर कारवाई..प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कारवाई करत असल्याचा गीतेंचा आरोप
गंगानदीची पाणीपातळी वाढल्याने उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पूरस्थिती.. अनेकांची घरं पाण्यात, तर गाड्याही गेल्या वाहून
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम
आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी.. वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा फुगडीचा फेरा, रथांचं केलं सारथ्य...