ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 AM : 30 March 2024 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 AM : 30 March 2024 : Maharashtra News
वर्षा बंगल्यावर शिंदे आणि फडणवीसांची रात्री अडीच तास बैठक.. उदय सामंत, शंभूराज देसाईही उपस्थित.रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छ. संभाजीनगर, पालघरच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती..
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार..बारामती, शिरुर, नगर, दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार, मविआत पवार गटाला १० जागा मिळण्याची शक्यता
मविआतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर, ठाकरे गटानं तात्काळ फेटाळला काँग्रेसचा प्रस्ताव
प्रकाश आंबेडकरांना मविआकडून काहीही मिळणार नाही, युती करण्यास आम्ही आजही तयार, MIMचे खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य
मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराठीत बैठक.. लोकसभा निवणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका स्पष्ट करणार
ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, संजय राऊत आणि आदेश बांदेकरांसह अनेक नेत्यांचा समावेश
पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख, नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान
पैठणच्या नाथवंशजांवरून सुरू असलेला अनेक वर्षांचा संघर्ष अखेर संपुष्टात, यावर्षीची नातषष्ठी सर्व नाथ वंशज एकत्र साजरी करणार
हिंगोलीत चिकन घेण्यावरून दोन गटांत तूफान दगडफेक, आठ जणांवर गुन्हा दाखल