ABP Majha Headlines : 08:00 AM : 18 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
वक्तव्याचा विपर्यास, रामगिरी महाराजांची सारवासारव, मात्र भूमिका आणि वक्तव्यावर ठाम असल्याचंही वक्तव्य
राज्यातील खड्डेमुक्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन, दर सोमवारी अहवाल सादर करा, अन्यथा कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा
जंक डेटा टाकून लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, तर गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनीच याची चौकशी करावी, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर
लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, रवी राणा, महेश शिंदेंना अजित पवारांनी मंचावरुन सुनावलं, महायुतीला पुन्हा निवडून देण्याचंही आवाहन
पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर दीड हजारांचे ३ हजार होतील, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, तर मविआ सत्तेत आल्यास तीन हजार देऊ, संजय राऊतांचा दावा
हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, संजय राऊतांचं मविआतल्या घटक पक्षांना आव्हानवजा आवाहन, तर बैठकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचं बघू, जयंत पाटलांची सावध प्रतिक्रिया..
हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका का नाही, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल, तर नोव्हेंबरमध्ये निवडणुकांचे एकनाथ शिंदेंचे संकेत..
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु, पंतप्रधान मोदींसमोरही विषय मांडल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती, पुण्यात ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ
अजित पवारांच्या गुलाबी यात्रेसाठी पैसे कुठून आले? अंजली दमानियांचा सवाल, स्वत:च्या संपत्तीचे पुरावे दाखवत सूरज चव्हाणांवर निशाणा
रत्नागिरीतील आंबा घाटात आढळले दोन मृतदेह, आत्महत्येचा संशय, दोन्ही पुरुष कोल्हापुरातील असल्याची माहिती