ABP Majha Headlines : 06 PM : 08 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM : 08 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
चंद्रपुरातील सभेत पंतप्रधान मोदींचा मविआवर निशाणा..महाराष्ट्रातील विकासकामांचा इंडिया आघाडीने विरोध केला, कमिशन द्या, नाही तर काम बंद करतो असं विरोधकांचं काम असल्याची मोदींची टीका
पंतप्रधान मोदींकडून ठाकरे गटाचा नकली शिवसेना उल्लेख.. aनकली शिवसेनावाले काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात बोलावून रॅली काढतात, मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
जाहीरनाम्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका.. विरोधकांकडे ना झेंडा, ना अजेंडा, मुख्यमंत्र्यांचा टोला
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंशी जवळीक वाढली, ते महायुतीला पाठिंबा देतील अशी अपेक्षा, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी फडणवीसांचे संकेत.
सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट, सासडवडमधील शिवतारेंच्या निवासस्थानी अर्धा तास चर्चा.
शरद पवारांचं घर सुनील तटकरेंनी फोडलं.. आव्हाडांचा आरोप. तर शरद पवारांशिवाय अजित पवारांचं कर्तृत्व नाही, अजित पवारांना टोला