ABP Majha Headlines : 04 PM: 23 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रातल्या भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात, १६ जण ठार, बसमध्ये होते ४० प्रवासी...
पुणे-सोलापूर रोडवर कंटेनरनं कारसह तिघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यु...घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..
राज्यपालनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्त्यांवरची सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर..नियुक्त्यांना स्थगिती द्यायला मात्र नकार..
आम्हाला मुख्यमंत्रीपदात रस नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य
नंदुरबारमध्ये धडगाव स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी, २ महिला बेशुद्ध..केवायसी करण्यासाठी बँकेत आल्या होत्या महिला...
उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करण्यावर ठाम, आधी निवडणुकांना सामोरं जाऊ मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका
विधानसभा निवडणुकीमध्ये गढूळ झालेल्या राजकारणावर राग व्यक्त करा, राज ठाकरेंचं वणीच्या सभेत आवाहन..सव्वा दोनशे जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार...
उद्याचा महाराष्ट्र बंद संस्कृती विरुद्ध विकृती, उद्धव ठाकरेंचा प्रहार, दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळण्याचं आवाहन, हायकोर्टानं दखल घेतली म्हणजे राजकारण का असा सत्ताधाऱ्यांना सवाल...
बदलापूर प्रकरणात पोलिसांनी नोंदवला दुसऱ्या पीडितेचाही जबाब, शाळेवारही पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, शिक्षकांची केली चौकशी...
मराठा आंदोलक मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार, सरकार कसं कर्ज माफ करत नाही ते पाहतो, जरांगेंचा सरकारला इशारा
नाशिकमध्ये काँग्रेस नेत्यांना मराठा आंदोलकांचा घेराव, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
अजित पवार विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांना गोंजारणार, सहा ते सात मतदारसंघांमध्ये मुस्लिम उमेदवार देणार, नबाव मलिक,सना मलिक,झिशान सिद्दीकींना उमेदवारी शक्य..
हर्षवर्धन पाटलांना भाजप सोडून जायचं असेल तर थांबवू शकत नाही, बावनकुळेंनी केलं स्पष्ट, समरजीत घाटगेंची जागा अजित पवार गटाकडं असल्यानं बाहेर पडतायत अशी माहिती..