(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 04 PM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पुन्हा सत्ता आल्यास मोदी सरकार १० जूनला शपथ घेणार असल्याची चर्चा, तर पाचव्या टप्प्यातच बहुमताचा आकडा गाठल्याचा अमित शाहांचा विश्वास
विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, छगन भुजबळांची मागणी, तर महायुतीचे तिन्ही नेते मिळून फॉर्म्युला ठरवतील, फडणवीसांचं उत्तर
सुनील तटकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप, अल्पसंख्य समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप
पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींकडून अपघातग्रस्त कारची पाहणी, अभियंत्यांकडून कारचं संपूर्ण तांत्रिक विश्लेषण
((पोर्शेच्या प्रतिनिधींकडून 'त्या' कारची पाहणी))
रॅश ड्रायव्हिंगप्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल बदलणाऱ्या ससूनच्या दोन डॉक्टरांना कोर्टात हजर केलं, आरोपीचं ब्लड सॅम्पल डॉक्टरांनी कचऱ्यात फेकून दिलं, पुणे पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती
अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी डॉ. अजय तावरेंना फोन केला होता का याचा तपास व्हावा, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप
पुण्यातील एक्साईज डिपार्टमेंट कार्यालयावर रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंचं आंदोलन, रात्री उशिरापर्यंत पब सुरू राहूनही कारवाई नाही, धंगेकरांचा आरोप, सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली हप्तेबाजीची जंत्री
मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ पाच टक्के पाणीसाठा शिल्लक, कित्येक किलोमीटरपर्यंत धरणक्षेत्र कोरडंठाक
बीड जिल्ह्यात मराठा दुकानदाराकडून कोणतीही वस्तू विकत घेऊ नका, वंजारीबहुल गावातला संवाद कॅमेऱ्यात चित्रीत, ग्रामस्थ बबन घोळवेवर गुन्हा दाखल, जातीय एकोपा कायम राखा, एबीपी माझाचं आवाहन
यावर्षी एसएससी बोर्डाचा निकाल ९५.८१ टक्के, निकालात कोकण विभाग अव्वल तर यंदाही मुलींचीही सरशी