एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 03 PM TOP Headlines 03 PM 21 September 2024
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 03 PM TOP Headlines 03 PM 21 September 2024
महाविकास आघाडीची २८८ जागांवर पहिल्या टप्प्यातली चर्चा पूर्ण...काही जागांची अदलाबदल केली जाणार असल्याची माहिती...
वडीगोद्री इथे उपोषणस्थळी तणावाचं वातावरण, मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी
एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करणार असाल तर चालणार नाही, अजित पवारांनी नितेश राणेंंचं नाव न घेता सुनावलं...तर, महायुतीमध्ये गेलो असलो तर फुल-शाहू-आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही, सुनील तटकरेंचा दावा...
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवार जाहीर करण्यात आघाडी, विदर्भ-मराठवाड्यातल्या ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा...
शिवस्वराज्य यात्रेत खडसे येतात की नाही ते माहीत नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच केले हात वर...
महाराष्ट्र सरकारला नोटीस देण्याचे नितीन गडकरींचे आदेश, मुंबई-पुणे जुना हाय वे आणि कल्याण-नगर रस्त्यांच्या दुरवस्थेवरुन गडकरी नाराज...
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा वाद अखेर हायकोर्टात, निवडणूक स्थगित करण्याविरुद्ध आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेची याचिका..