DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
Central Government Employees Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महागाई भत्ता हा ऑक्टोबरच्या पगारासोबत दिवाळीआधी दिला जाणार आहेत.

नवी दिल्ली : दसरा आणि दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) खुशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance DA) तीन टक्क्यांची वाढ करून त्यांना दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 55 टक्क्यांवरुन 58 टक्के इतका झाला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महागाई भत्ते (DA Arrears) ऑक्टोबरच्या पगारासोबत (October Salary) दिवाळीआधी दिले जाणार आहेत.
महागाई भत्त्यातील वाढ (DA Hike & Impact)
महागाई भत्त्याचा दर (DA Rate) मूळ पगार आणि पेन्शनच्या 55% वरून 58% केला गेला आहे.
ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) अंतर्गत सर्व केंद्र सरकारच्या कर्मचार्यांवर, पेन्शनर्स (Pensioners) वर लागू होईल. या वाढीमुळे सुमारे 48 लाख कर्मचाऱ्यांना आणि 68 लाख पेन्शनर्सना लाभ होईल.
सरकार दरवर्षी महागाई भत्त्याचा (DA Revision) संशोधन दोनदा – जानेवारी आणि जुलै मध्ये करते.
ही यावर्षीची दुसरी वाढ असून सातव्या वेतन आयोगानुसार अंतिम वाढ मानली जाण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता कसा दिला जातो? (How DA is Calculated and Paid)
केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता मूळ पगार आणि पेन्शनच्या ठराविक टक्केवारीवर आधारित असतो.
दर सहा महिन्याला (January आणि July) महागाई आकडेवारीनुसार भत्ता सुधारला जातो.
जर मागील सहा महिन्यांमध्ये महागाईचा दर जास्त असेल, तर त्यानुसार भत्त्यात वाढ होते आणि पगारासोबत जमा केली जाते.
ही वाढ सर्व कर्मचार्यांना त्यांच्या मूळ वेतनावर आणि पेन्शनवर लागू केली जाते.
महागाई भत्ते (DA Arrears) जर पूर्वी अद्याप दिले गेले नसतील, तर ते पुढील पगारामध्ये जमा करून दिले जातात.
Railway Employee Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस
रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस (Diwali Bonus) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने 10.91 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मंजूर केला आहे. यासाठी एकूण 1,865.68 कोटी रुपये खर्च होणार असून कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच रक्कम जमा होईल. हा लाभ ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, गार्ड, स्टेशन मास्टर, सुपरवायझर, टेक्निशियन, हेल्पर, पॉइंट्समन आणि इतर ग्रुप C कर्मचार्यांना मिळणार आहे.
ही बातमी वाचा:























