एक्स्प्लोर

‘ये ना पुन्हा’... ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटातील रोमँटिंक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव

दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात, “प्रेमाच्या प्रवासातील काही क्षण आयुष्यभर लक्षात राहातात. ‘ये ना पुन्हा’ हे गाणं त्या क्षणांची जादू प्रामाणिकपणे पकडतं.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट 2’ या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा (Cinema) टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता या चित्रपटातील पहिलं गोड, रोमँटिक गाणं ‘ये ना पुन्हा’ प्रदर्शित झालं आहे. रोहित राऊतच्या युथफुल आणि फ्रेश आवाजात सादर झालेलं हे गाणं (Song) श्रोत्यांना प्रेमाच्या नव्या भावविश्वात घेऊन जाणारं आहे. अविनाश–विश्वजीत यांनी दिलेलं आकर्षक आणि मॉडर्न टच असलेलं संगीत, तसेच विश्वजीत जोशी यांनी लिहिलेले आजच्या पिढीच्या मनाला भिडणारे शब्द यामुळे हे गाणं तरुणाईला निश्चितच आवडेल. हे गाणं ऐकताच कोणालाही प्रेमात हरवल्यासारखं, आठवणींमध्ये रममाण झाल्याचं वाटेल.

दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात, “प्रेमाच्या प्रवासातील काही क्षण आयुष्यभर लक्षात राहातात. ‘ये ना पुन्हा’ हे गाणं त्या क्षणांची जादू प्रामाणिकपणे पकडतं. पडद्यावर ही भावना आणताना आम्ही प्रत्येक फ्रेममध्ये युथच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न केला आहे.” निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “हे गाणं ऐकल्यावर मनात पुन्हा प्रेम फुलल्यासारखं वाटतं. शब्द, संगीत आणि रोहितचा आवाज – या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन हे गाणं आजच्या तरुणाईला आणि संगीतप्रेमींना नक्की भावेल.” गायक रोहित राऊत म्हणतो, “या गाण्याचा प्रत्येक सुर आणि शब्द खूप खास आहे. गाताना मला जबरदस्त मजा आली आणि खात्री आहे की, हे गाणं ऐकताना प्रत्येकजण आपल्या लव्हस्टोरीशी रिलेट करेल.” संगीतकार अविनाश–विश्वजीत म्हणतात, “हे गाणं तयार करताना आमचं एकच ध्येय होतं ते म्हणजे आजच्या युथला एक शुद्ध, रोमँटिक आणि जादुई अनुभव देणे. आम्हाला विश्वास आहे की, हे गाणं सर्व संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून जागा मिळवेल.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया तर सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या नव्या प्रेमकथेत ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम हे कलाकार झळकणार आहेत. प्रेम आणि नशिबाचा हा सुंदर प्रवास प्रेक्षकांना एक नवा, ताजातवाना अनुभव देईल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.   

VIDEO : ये ना पुन्हा - प्रेमाची गोष्ट

 

हेही वाचा

माझ्या आईने जग सोडण्यापूर्वी एक चिठ्ठी सोडली, त्यात लिहलंय, डोनाल्ड ट्रम्प तुझे खरे वडील आहेत; राखी सावंतचा गौप्यस्फोट

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget