Gadchiroli : पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर ABP माझाचा चित्तथरारक Ground Report
गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडो आणि नक्षल सोबत झालेल्या भीषण चकमकीत 26 नक्षल्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले यात केंद्रीय समितीचा सद्स संपूर्ण दंडकारण्य भागात त्याचा वर्चस्व असणाऱ्या मिलिंद तेलतुंबडे याचा ही समावेश आहे. सोबत डिव्हीजन कमिटी सद्स महेश गोटा आणि कँपनी 4 चा कमांडर लोकेश ही मारला गेला. यामुळे नक्षली संघटनेला मोठा हादरा बसला आहे ही चकमक नेमकी कशी घडली कुठे घडली गडचिरोली पोलिसांना हे यश कसा मिळाले त्यांची ही कामगिरी दाखवण्यासाठी थेट ग्राऊंड झिरोवर आमचे प्रतिनिधी तब्बल 15 किलोमीटर पायी चालत डोंगराळ भागातुन दऱ्या खोऱ्यातून आपला जीव धोक्यात घालून घटनास्थळी पोहचले बघा एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोट.






















