Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले… ABP Majha
राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. अधिवेशनाचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीची सबब देत अधिवेशनाला गैरहजर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित न राहिल्याने विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच उद्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तसेच विधिमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला असून एक मंत्री आणि एका आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विधीमंडळ आवारात प्रवेशापूर्वी आजपासून डेली टेस्ट करावी लागणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.



















