100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 September 2024
सात दिवसांच्या गणपतींचे आज विसर्जन, तर राज्यात अनेश शहरांमध्ये काल सहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरी, गणपतीचं विसर्जन.
ठाण्यात जागतिक तापमान वाढीवर लक्ष वेधणारा देखावा, निसर्गाचे संरक्षण केलं नाही तर एक दिवस मृत्यू अटळ असा बोध देखाव्यातून सांगण्याचा जय भवानी गणेशोत्सवाचा प्रयत्न
प्रकाश आंबेडकरांनी घेतलं अकोल्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या घरी गणपती आणि गौराईचं दर्शन, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल राऊत यांच्या घरी आरतीमध्ये झाले सहभागी
भिवंडीत तृतीयपंथीयांच्या घरी बाप्पा विराजमान, समाजात मान मिळावा म्हणून तृतीयपंथीयांचं बाप्पाला साकडं.
रायगडच्या रोह्यात किल्ल्यांचं संवर्धन राखण्यासाठी संस्थेचा देखाव्यातून संदेश, देखाव्यातून गड किल्ल्यांचे महत्त्व नविन पिढीला कळावं हा संस्थेचा उद्देश.
एक लाख टिशू पेपरपासून साकारली १६ फुटी गणपतीची मूर्ती, भाईदर परिसरातील नवयुवक मित्र मंडळाचा उपक्रम, ४ वर्षांपासून खडू, पेपर, फुले यांच्या पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती