एक्स्प्लोर
Latur Uncertain Rain : लातूर जिल्ह्यात अवकाळीचा तुफानी कहर, वीज कोसळून एका मुलीसह 10 बैलांचा मृत्यू
तिकडे लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला..लातुरात पाऊस सुरु होण्यापूर्वी जोरदार वारा आणि विजेचा कटकडाट सुरू होता.. वीज कोसळ्यानं दापका परिसरात एका मुलीचा मृत्यू झाला... तर १० बैलदेखील मृत्यूमुखी पडली आहेत. शिवाय शेतीचं नुकसान झालं ते वेगळंच... पशूधनासह शेतमालाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. तिथे चाकुर,निलंगा, निटुर या ग्रामीण भागासह उदगीर परिसरातही प्रचंड गारपीट झाली.. या पावसानं केशर आंबा, द्राक्षासह इतरही फळबागांचे नुकसान झालं असून, प्रशासनानं नुकसान तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आणखी पाहा



















