Sanjay Mandlik Kolhapur Lok Sabha : विजयाचा 100 टक्के विश्वास : संजय मंडलिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होत आहेत... महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी ही सभा होतेय... कोल्हापूरच्या तपोवन मैदानात ही सभा होणार आहे... साधारण चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये दाखल होतील... या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत...राज्याच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री देखील या सभेला उपस्थित राहतील.. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान यावेळी संजय मंडलिक यांनी ठाकरे गट आणि कोल्हापुरातील काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.. संजय मंडलिक यांच्याशी बातचीत केले आहेत आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.
महत्त्वाच्या बातम्या























