Kolhapur Arun Gandhi: महात्मा गांधींचे नातू अरूण गांधी पंचत्वात विलीन
महात्मा गांधी यांचे नातू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण गांधी पंचत्वात विलीन झालेत... वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी कोल्हापूरमध्ये आज अखेरचा श्वास घेतला... अरुण गांधी यांच्या पार्थिवावर त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी अंत्यसंस्कार केले... गांधीवादी विचारांचे अरुण गांधी फेब्रुवारीपासून कोल्हापुरातच वास्तव्यास होते... कोल्हापुरात ज्या मुलांसाठी आयुष्य वेचले त्याच ठिकाणी आपल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार व्हावेत, अशी अरुण गांधी यांची इच्छा होती.... त्यामुळे कोल्हापुरच्या वाशी या गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.... अवनी संस्थेसाठी अरुण गांधी यांनी 26 वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान दिलंय... भारतात आल्यावर ते आवर्जून अवनी संस्थेला भेट देण्यासाठी येत...























