Agniveer Recruitment : 22 नोव्हेंबरपासून कोल्हापूरात अग्निवीर भरती, 98 हजार तरुणांची ऑनलाईन नोंदणी
कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरतीची प्रक्रिया 22 तारखेपासून सुरू होणार आहे...11 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे..कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर या भरतीची तयारी सुरू असून साधारण 98 हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे...अग्नीवीर योजनेच्या विरोधात देशभर आंदोलने झाली असली तरी मैदानावरची चित्र वेगळे पाहायला मिळतंय... कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि गोवा इथले तरुण या भरतीमध्ये सहभागी होणार आहेत..एकाच वेळी तरुणांची गर्दी होऊ नये यासाठी दररोज 5000 तरुणांना भरतीसाठी बोलवले जाणार आहेत... या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...


















