एक्स्प्लोर
Jalna God Idols : समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोर अटकेत, आरोपींकडून हनुमानाच्या मूर्ती जप्त
Jalna Ram Mandir Theft : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आता पोलीस मुख्य आरोपीच्या मागावर आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून समर्थांच्या हनुमानाच्या मूर्ती जप्त केल्या आहेत. जालनामधील समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून (Ram Mandir) ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी तपासात पोलिसांना मोठं यश आलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















