Jalna Crime : मराठा आरक्षणसाठी जीवन संपवल्याचा बनाव, बापानेच केली लेकाचा घेतला जीव
मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव करत वडिलानेच मुलाची हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील मुरमा गावात उघडकीस आलीय. मयत शिवप्रसाद थुटे या 22 वर्षीय मुलाच्या हत्येच गूढ उकलले आहे. मुलाच्या आरोपी वडिलाला पोलिसांनी अटक केलीय. दरम्यान मृत्यूनंतर आठ दिवसाने आलेल्या पोस्टमार्टम अहवालामध्ये मयत शिवप्रसाद याची गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला, मात्र ही हत्या नेमकी कोणी केली याचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान आरक्षण आंदोलनामुळे पोलिसांनी गुप्तपणे चौकशी करत मयत मुलाचे वडील शिवप्रसाद थुटे यांची सखोल चौकशी केली, त्याने आपण कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याचं कबूल केलं.























