एक्स्प्लोर
Special Report | शेतकरी आंदोलनाचे सहा महिने झाले, आता पुढे काय?
राजधानी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे मागे घ्यावेत या एका मागणीवर अजूनही आंदोलक ठाम आहेत. आज त्यासाठी काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलनही करण्यात आलं. 26 नोव्हेंबर ते 26 मे...दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनानं सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. पोलिसांच्या लाठ्या काठ्या खात हे आंदोलन पंजाब, हरियाणातून दिल्लीच्या सीमेवर आलं आणि सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या सरकारलाही त्यांची दखल घ्यावी लागली. आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज शेतकऱ्यांनी निषेध आंदोलनही केलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























