एक्स्प्लोर

Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाचा भररस्त्यात पाठलाग करत त्याला संपवण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बाणेर परिसरात घडली आहे.  

Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंध (Love Relationship) असल्याच्या संशयातून एका तरुणाचा भररस्त्यात पाठलाग करत लोखंडी हत्याराने वार करून त्याला संपवण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune) बाणेर (Baner) परिसरात घडली आहे.  गुरुवारी (6 ऑगस्ट) सकाळी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास रायकर फार्म (Raikar Farm) येथील ब्रह्मकुमारी सेंटर परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी बाणेर पोलिसांनी (Police) सोलोमन सूर्यभान शेंडगे (वय 52) याला अटक केली आहे. तर घनश्याम संजय रायकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय कृष्णाजी रायकर यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime News: वर्गमैत्रिणीवर एकतर्फी प्रेम, नकारानंतर सुरू झाला त्रास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोलोमन शेंडगे याचे रायकर मळा परिसरातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. संबंधित तरुणी ही त्याची वर्गमैत्रीण होती. आरोपीने अनेक वेळा तिच्याकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. नकार मिळाल्यानंतरही आरोपी तिचा सतत पाठलाग करत होता. तसेच, अश्लील संदेश पाठवून मानसिक त्रास देत होता. याशिवाय, "तुझे घनश्याम रायकर याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत," असा संशय व्यक्त करून तो वारंवार तरुणीला त्रास देत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Pune Crime News: घराबाहेर बोलावून केला हल्ला

आरोपीच्या सततच्या त्रासामुळे संबंधित तरुणी आणि घनश्याम रायकर दोघेही त्रस्त झाले होते. आरोपीचा छळ थांबला नाही तर पोलिसांत तक्रार करू, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. याचाच राग आरोपीच्या मनात होता. गुरुवारी सकाळी आरोपीने घनश्याम रायकर याला रायकर मळा परिसरातील घराबाहेर बोलावले. त्यानंतर त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार केले. गंभीर जखमी झालेला घनश्याम जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मात्र, आरोपीने त्याचा पाठलाग करत काही अंतरावर पुन्हा गाठले आणि भररस्त्यात सपासप वार केले. या हल्ल्यात घनश्याम रायकर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Pune Crime News: आरोपी अटकेत, पुढील तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच बाणेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी सोलोमन शेंडगे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
Pune Crime News: मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
Mumbai Cyber Crime News: 5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 51 लाख रुपये मिळणार; इन्स्टाग्रामवर रील आली, पुढे धक्कादायक घडलं, मुंबईतील घटना!
5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 51 लाख रुपये मिळणार; इन्स्टाग्रामवर रील आली, पुढे धक्कादायक घडलं, मुंबईतील घटना!
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी

Embed widget