गैरभाजप मुख्यमंत्र्यांसोबत Sonia Gandhi यांची बैठक, मुख्यमंत्री Uddhav Thackeray राहणार उपस्थित
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. या बैठकीत शेतकरी कायदे, केंद्र आणि राज्यातील समन्वय यावर चर्चा होणार आहे, मात्र आम आदमी पार्टी आणि अकाली दल यांना या बैठकीचं निमंत्रण नसल्याचं सांगण्यात येत आहे.
देशातील मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्यांची ही बैठक होणार असून जे पक्ष राज्य स्तरावर विरोधी पक्षात काम करत आहेत त्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत त्यापैकी पॅगसेस, महागाई यासारख्या अनेक विषयावर चर्चा होणार आहे ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, झारखंड,केरळ ,छत्तीसगढ चे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.




















