Rajiv Gandhi Khel Ratna award खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया : ABP Majha
भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की खेलरत्न पुरस्कारचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल." भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे.





















