Pahalgam Terror Attack : आख्ख्या देशाच्या डोळ्यात पाणी, वीरपत्नीचा लेफ्टनंट पतीला अखेरचा सॅल्यूट
पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात, भारतीय नौसेनेचे २६ वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला... काल बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी गोळी झाडल्यानंतर त्यांच्या मृतदेहाशेजारी, खिन्न मनाने बसलेल्या पत्नीचा फोटो व्हायरल झाला होता... त्यानंतर आज नरवाल यांचं पार्थिव आज दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं.. त्यांना नौदलातर्फे मानवंदना दिली गेली.. यावेळी पत्नी हिमांशीच्या भावना अनावर झाल्या.. आणि तिने थेट पार्थिवावर झोकून देत, मोठ्याने टाहो फोडला... तिची ही अवस्था पाहून उपस्थितांचंही मन हेलावून गेलं...
पहलगाममधील कालची दुपार पर्यटकांच्या अंगावर काटा आणणारी ठरली. दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारुन गोळ्या झाडल्या, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील करुण कहाण्या आता समोर आल्या आहेत. सहा पतींना पत्नींच्या समोरच अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. कुणी हनिमूनला तर कुणी लग्नाचा वाढदिवस साजरा करायला काश्मीरमध्ये आले होते. पण दहशतवाद्यांच्या रक्तरंजित खेळामुळे कुटुंबीयांच्या मनावर खोलवर जखमा केल्या.






















