एक्स्प्लोर
Nirbhaya Case | सर्व चार दोषींना तिहार जेलमध्ये हलवलं, लवकरच फासावर लटकवण्याची शक्यता | ABP Majha
हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर, दिल्लीतील निर्भया गँगरेपच्या दोषींना फासावर कधी लटकावणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु आता निर्भयाच्या सर्व दोषींना फासावर लटकवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील चारही दोषींना 16 डिसेंबर रोजीच फासावर लटकवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. तर निर्भया गँगरेप प्रकरणातील चार दोषींपैकी एक पवनला मंडोलीच्या जेल क्रमांक 14 मधून तिहार कारागृहाच्या जेल क्रमांक 2 मध्ये हलवण्यात आलं आहे. याच जेलमध्ये निर्भयाच्या चार दोषींपैकी अक्षय आणि मुकेश हे दोघे कैद आहेत. तर विनय शर्मा जेल क्रमांक 4 मध्ये कैद आहे.
आणखी पाहा























