Kalyan shreeram Welcome : वजीर सुळक्या वर भगवा रोवत रामाचं अनोख्या पद्धतीने स्वागत
Kalyan shreeram Welcome : वजीर सुळक्या वर भगवा रोवत रामाचं अनोख्या पद्धतीने स्वागत कल्याणकरांचे श्री रामांच्या अयोध्येतील मंदिराचे अनोख्या पद्धतीने स्वागत,इतिहासात पहिल्यांदाच अती कठीण वजीर सुळक्या वर श्री रामांचं चित्र असलेला भगवा रोवत केलं मंदिराचे स्वागत. कल्याण येथील आणि संपूर्ण महााष्ट्रातील अग्रगण्य असलेली गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक ऍडवेंचर सुळक्यावर भगवा रोवत श्री राम मंदिराचे अनोख्या पदधतीने स्वागत करण्यात आले.वजीर सुळका म्हणजे ९० अंश कोणात उभा असलेला आणि सुमारे ३०० फूट उंच असलेला एक सुळका.इतिहासात पहिल्यांदाच वजीर सुळक्याच्या माथ्यावरून श्री रामांचा भगवा ध्वज लागल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. वांद्रे गावातून गिर्यारोणाची सुरुवात करत सुमारे ३००० फूट उंच असलेला सुळक्याच्या पायथ्याशी श्री रामांची विधिवत पूजा करत ह्या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली.शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी ही मोहीम कल्याण करांच्या चमूसाठी अविस्मरणीय ठरली. बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर मांडावा तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. नजर टाकली तरी अंगाला दरदरून घाम फोडणारा हा सुळका.थोडी जरी तांत्रिक चूक झाली की जीवाला मुकावे लागणार असल्याने मृत्यूची भीती कायम,त्यात अश्या अती कठीण सुळक्यावर कल्याण करांनी भगवा ध्वज लावल्याने सर्वत्र सह्याद्री रॉक ऍडवेंचर संघाचे कौतुक करण्यात येत आहे. सदर विशेष मोहिमेत संघाचे पवन घुगे,दर्शन देशमुख,रणजित भोसले,भूषण पवार,सुहास जाधव,सुनील खनसे,अभिजीत कळंबे,स्वप्नील भोईर,प्रशील अंबाडे,राहुल घुगे यांनी सहभाग नोंदवून हा विक्रम करून दाखवला