(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pradeep Kurulkar : डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्या एटीएस कोठडीत 15 मेपर्यंत वाढ
बुलेटिनच्या सुरूवातीलाच भारताच्या सुरक्षा यंत्रणेला धक्का देणारी... देशाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर तुरूंगात आहेत. आज त्यांच्या एटीएस कोठडीत १५ मेपर्यंत वाढ करण्यात आलीय. पाकिस्तानकडून गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैन्यदलातील अधिकारी, जवान आणि शास्त्रज्ञांभोवती हनी ट्रॅपच जाळं विणण्यात येतंय. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या आवडी-निवडींची माहिती काढून सावज हेरलं जातंय. त्याचीच शिकार डॉ. प्रदीप कुरूलकर ठरल्याचा आरोप आहे. भारताची क्षेपणास्त्र मोहीम, आण्विक ऊर्जा कार्यक्रम, भारतीय सैन्य दलासाठीचं महत्त्वाचं तंत्रज्ञान, यांसारख्या मोहिमांचा भाग असलेले डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपच्या जाळ्यात अलगदपणे अडकत गेले. आणि त्यांनी अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तहेरांना पुरवल्याचा त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.