Congress Meeting : विधानसभेची तयारी ; काँग्रेसची दिल्लीत खलबतं
Congress Meeting : विधानसभेची तयारी ; काँग्रेसची दिल्लीत खलबतं महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतून 27 जुलै रोजी 11 आमदार निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे या आमदारांची परिषदेवर निवड झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगनं या 11 जागांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभेतील संख्या बळानुसार सध्या महायुतीचे 9 तर मविआचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांच्या मतांमधून एक उमेदवार विजयी होऊ शकतो. काँग्रेस नेमकं कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विधानसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीतील बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत देखील चर्चा होऊ शकते. काँग्रेसच्या काही नेत्यांची नावं देखील चर्चेत आहेत.