Brij Bhushan Singh : राज ठाकरेंनी शब्द मोडला,पण मी पाळणार,लाखो समर्थकांसह बृजभूषण सिंह यांची रॅली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करुन चर्चेत आलेले कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसासाठी जय्यत तयारी केलीय. योगींच्या वाढदिवसानिमित्त बृजभूषण सिंह यांनी ५१ क्विंटलचा लाडू बनवलाय. योगींच्या वाढदिवसानिमित्त या लाडूचं प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशात पाऊल ठेवू देणार नाही असं आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिलं होतं. त्यावेळी पाच लाख समर्थकांसह त्यांनी अयोध्येकडे कूच केलं होतं. दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला. मा्त्र बृजभूषण सिंह यांनी मात्र आपला दौरा रद्द केला नाही.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

