Ayodhya Ram Mandir Security : अयोध्येत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, राममंदिर परिसरात आनंदाचं वातावरण
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत... रामाची जुनी मूर्ती राममंदिरात आणण्यात आली... गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आलेत... दरम्यान राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे... अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. कारण सर्वांच्या लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठा होणारेय. आज १२ वाजून २९ मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणारे.. आणि ज्या मंदिरात हा महन्मंगल सोहळा संपन्न होणारेय. त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोनावर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालंय




















