Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या सध्याच्या मंदिरात दर्शनपूजा बंद, मंदिर प्रशासनाकडून तयारी
Ayodhya Ram Mandir : अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या सध्याच्या मंदिरात दर्शनपूजा बंद, मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी
आता बातमी आहे रामल्लाच्या अयोध्येतून...
श्री रामाच्या सध्याच्या मंदिरात भाविकांची दर्शन पूजा २० जानेवारीपासून बंद होणार आहे. मात्र, मंदिरातील पुजारी पूजेचा कार्यक्रम सुरू ठेवणार आहेत. तसंच विविध कार्यक्रमांची तयारीही करण्यात आलीये. तात्पुरत्या मंदिरातून प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थापित करण्यासाठी २० जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत तात्पुरत्या मंदिरात भक्तांचे दर्शन आणि पूजा बंद राहणार असल्याचं रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा यांनी सांगितलंय. ट्रस्टच्या निमंत्रण पत्रिकेसोबतच २२ जानेवारीला अयोध्येत प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















