Ahmedabad Air India Plane crash : विमान जिथे कोसळलं ते ठिकाण नेमकं कसं? जीवघेण्या स्पॉटवरून रिपोर्ट
PM Narendra Modi Airport : अहमदाबाद विमान अपघात घटनास्थळाची नरेंद्र मोदींकडून पाहणी
Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये (Air India Plane Crash In Ahmedabad) एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येतेय. यात महाराष्ट्रातील 9 जणांचा समावेश आहे.
दरम्यान विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं. विमानाच्या टेकऑफनंतर 50 सेकंदांमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे.
विमानात बसण्यापूर्वी मोबाईल एयरप्लेन मोडवर टाकणे आवश्यक-
विमानात बसण्यापूर्वी तुम्हाला तुमचे सर्व इलेक्ट्रॉनिक डिवाइसेज बंद करणे महत्वाचे असते किंवा ते एयरप्लेन मोडवर (Airplane Mode) टाकावे लागतात. परंतु बऱ्याचदा लोक असं करत नाहीत. केबिन क्रू नेहमीच प्रवाशांना त्यांचा फोन बंद करण्यास किंवा एयरप्लेन मोडवर टाकण्याच्या सूचना देत असतात परंतु अनेकजण आपली मनमानी करतात.






















