एक्स्प्लोर
Sonu Sood Meets Sharad Pawar | अभिनेता सोनू सूद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला
अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. सोनू सूदने शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. निवासी इमारतीत अवैध हॉटेल सुरु केल्याच्या आरोप मुंबई महापालिकेने सोनू सूदवर केला असून हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. त्यातच सोनूने शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळेच तर सोनू सूदने शरद पवार यांची भेट घेतली नाही ना अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी पाहा























