एक्स्प्लोर
Sambhaji Nagar : धक्कादायक! विद्यार्थीनीला वर्गात कोंडून निघून गेला वॉचमन, मनपा शाळेतील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या शाळेतील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी वर्गात असताना वॉचमन खोलीला कुलूप लावून निघून गेला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने खिडकीजवळ येऊन रडायला सुरुवात केली. त्यानंतर आसपासच्या मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी कुलूप तोडून तिला बाहेर काढले. शहरातील रोजाबाग येथील महानगरपालिका शाळेतील हा प्रकार असून, या घटनेनंतर पालकांमध्ये संतपाचे वातावरण असून, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























