एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar MVA Protest : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचं आंदोलन; अंबादास दानवे सहभागी

Chhatrapati Sambhajinagar MVA Protest :  छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचं आंदोलन; अंबादास दानवे सहभागी   

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी 'निषेध आंदोलन' केले जात आहे. आज पुण्यातही भर पावसात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मूक आंदोलन केलं. या आंदोलनात शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे(Supriya Sule), काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील घटना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला दिला. त्याचबरोबर उपस्थितांना एक शपथ घ्यायला लावली. महिलांवर कधीही अत्याचार करणार नाही, करू देणार नाही अशा आशयाची ही शपथ होती. यावेळी मविआचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या घटनेने देशभरात महाराष्ट्राच्या लौकिकाला मोठा धक्का 

राज्यात घडत असलेल्या बदलापूरसारख्या अस्वस्थ करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या छत्रछायेखाली एकत्र आलो आहोत. बदलापूरला बालिकेवर अत्याचार झाला. या घटनेने देशभरात महाराष्ट्राच्या लौकिकाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील मुली- महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारवर आहे, याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही. बदलापूरमधील घटनेचा निषेध होत असतानाच राज्यात घडलेल्या इतर ठिकाणच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज अशा घटना घडत आहेत, असं शरद पवारांनी (Sharad Pawar)मूक मोर्चानंतर बोलतान म्हटलं आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र हे शिवछत्रपतींचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी माहाराजाच्या काळात एका भगिनीवर अत्याचार केल्याची तक्रार  महाराजांकडे गेली होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले. तसंच आता जे काही घडलं आहे. त्याची गांभिर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशीलपणे या गोष्टी हाताळल्या पाहिजेत, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

पुण्यात भर पावसात मूक मोर्चा

बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मुक आंदोलनं केली जात आहेत. पुण्यात भर पावसा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ करण्यात आलं आहे. तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फीत बांधून शरद पवार यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक नेते यावेळी पावसात भिजल्याचं दिसून आलं. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget