Chatrapati Sambhajinagar : दोन गट आमने सामने, पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता
रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरच्या किऱ्हाडपुरा भागात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता.. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे असं पोलिसांनी सांगितलंय. शहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर संभाजीनगरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटाने जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. पाहता पाहता घटनेने रौद्ररूप धारण केले. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या.. काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाल्याचंही वृत्त आहे.. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत १२ गोळ्या झाडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.
महत्त्वाच्या बातम्या























