Tadoba Tiger Reserve : ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पाचं ख्रिसमस,न्यू ईयरसाठी ऑनलाईन बुकींग बंद
तुम्ही जर का यावर्षी ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्य ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पाच्या जंगल सफारीचा बेत आखात असेल तर थांबा... कारण ऑनलाईन बुकिंग मध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यहारामुळे सध्या ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पात जंगल सफारीची ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे दिवाळी नंतरच्या नाताळ व नवीन वर्षाच्या सुट्टी काळातील बुकिंग वर त्याचा परिणाम झाला आहे. सफारी बुकिंग बंद असल्याने रिसॉर्ट बुकिंग, जिप्सी बुकिंग, टॅक्सी बुकिंग हे सर्वच ठप्प पडली आहे. ऑनलाईन बुकिंग ची जबाबदारी असलेल्या डब्ल्यूसीएस कंपनीवर 12 कोटीच्या फसवणुक केल्याचा वन विभागाचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. यावर तोडगा निघेपर्यंत बुकिंग बंद ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. यामुळे व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.























